4k समाचार पनवेल दि. 20
मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेलजवळ राऊत सर्जिकल रुग्णालयासमोर चार फूट लांबीचा मगर जखमी अवस्थेत सापडला. हा मगर पाहिल्यानंतर एका नागरिकाने वन्यजीव संरक्षण कार्यकर शतुनू कुवेसकर यांना याबाबत माहिती दिली. कुबेरकर यांनी तातडीने वनविभाग व वन्यजीव संरक्षण संस्थेशी संपर्क साधला.

वन्यजीव रक्षकांनी घटनास्थळी दाखल होत मगरीला सुरक्षितपणे पकडले. मगरीच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याचे दोन पाय अधू होते. सध्या मगरीवर उपचार सुरू आहेत.
