नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत पनवेल मधील  रुद्राणी पाटीलला तीन सुवर्णपदक



पनवेल:पनवेल येथील रुद्राणी परेश पाटील या आठ वर्षाच्या चिमुकलीने दि.15 रोजी उरण येथे आयोजित जिल्हा स्तरित जलतरण आमदार चषकात तब्बल 3 सुवर्ण पदक पटकावले आहेत. रुद्राणीने 50 मीटर फ्रीस्टाइल, बॅक स्ट्रोक, व बटरफ्लाय या तीन प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक व ब्रेस्टस्ट्रोक या प्रकारामध्ये तृतीय क्रमांक मिळवून सर्व स्पर्धकांवर आपले वर्चस्व सिद्ध केले. 


    स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उरण नगरपरिषद व महेश बालदी मित्र मंडळ, उरण यांच्या संयुक्त विद्यमानाने या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून वयोगट 6 ते 60 वर्षां खालील अनेक जलतरणपट्टूनीं  सहभाग घेतला होता.या स्पर्धेत कुमारी रुद्राणी परेश पाटील हिने 8 वर्षांखालील गटांमध्ये अप्रतिम कामगिरी करून आपले कौशल्य सिद्ध केले.

तिच्या या कामगिरीबद्दल तिला 3 सुवर्ण पदके व 1 कांस्य पदक तसेच चॅम्पियनशिप ट्रॉफी प्रदान करण्यात आली.रुद्राणीच्या या उत्तुंग यशामध्ये तिचे प्रशिक्षक समर्थ नाईक व सुजल मढवी यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या उत्तुंग कामगिरीमुळे पनवेल मधील कल्पतरू सोसायटी तिचे मूळ गाव खोपटे मध्ये तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top