4k समाचार
पनवेल ता. 5 (प्रतिनिधी)
कळंबोली परिसरातील “रॉयल मॅन” म्हणून परिचित असलेले माजी नगरसेवक विजय मनोहर खानावकर यांनी यंदाचा आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत अत्यंत साधेपणाने आणि जनसेवेच्या माध्यमातून साजरा केला.

विजयादशमीच्या शुभदिनी (ता. 2 ) त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमध्ये मोफत आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप यांचा समावेश होता. हे सर्व कार्यक्रम विठ्ठल मंदिर, सेक्टर 31, के.एल.ई. स्कूल जवळ, कळंबोली येथे पार पडले. आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांना मोफत तपासणी व सल्ला देण्यात आला. यात बी.पी., रक्तातील साखर, दमा, एच.बी. (हिमोग्लोबिन), कॅल्शियम, कोलेस्टेरॉल, युरिक अॅसिड अशा विविध तपासण्यांचा समावेश होता. तसेच नेत्र तपासणी करून गरजूंना मोफत चष्मे देण्यात आले. रक्तदान शिबिरातही नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.
तसेच वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याच्या हेतूने विविध ठिकाणी सेवा उपक्रम राबविण्यात आले. त्यात
एमजीएम रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप, बालग्राम अनाथ आश्रमात भोजन व वस्त्र वाटप,

आसूडगाव येथील गौ शाळेत चारा वाटप करण्यात आले. या सर्व उपक्रमांचे आयोजन विजयदादा खानावकर युवा मंच, कळंबोली यांच्या वतीने करण्यात आले.
या प्रसंगी परिसरातील नागरिक, कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी नगरसेवक विजय खानावकर यांनी वाढदिवस साजरा करण्याऐवजी समाजसेवेला प्राधान्य देत एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा हा सामाजिक जाणिवेचा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
