नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

महावितरणच्या स्मार्ट मीटर बसवणीला विरोध  शिरवणेकरांचा आंदोलनात्मक मोर्चा


4k सामाचार दि. 22

नवी मुंबई | शिरवणे गाव आणि परिसरात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून (महावितरण) जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवले जात असल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मोठा मोर्चा काढला. डॉ. राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिरवणे गावातील नागरिक व विविध संघटना मिळून नेरुळ येथील एमएसईबी कार्यालयावर धडकले. 



या वेळी “स्मार्ट मीटर हटवा, जनतेला वाचवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात अनावश्यक वाढ होत असून नागरिकांवर आर्थिक भार टाकला जात आहे. याविरोधात अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. 



मोर्चादरम्यान नागरिकांच्या मागण्यांचे निवेदन महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आले. जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया थांबवून लोकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top