4k समाचार दि. 22
नवी मुंबई | कोपरखैरणे परिसरात तब्बल २६ लाखांचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी घरातील महिलेच्या भावाच्या दोन मित्रांनी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

शिवानी कारकुर व तिचा भाऊ अभिषेक घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. मात्र परत आल्यानंतर त्यांनी कपाट उघडून पाहिले असता सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गायब झाल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे घराची चावी चप्पल स्टॅण्डमध्ये लपवून ठेवलेली होती. या प्रकरणी शिवानी कारकुर यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
