4k समाचार पनवेल (वार्ताहर):
आज दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता पनवेल डीसीपी कार्यालयात सकल मराठा समाज पनवेल यांच्या प्रतिनिधींची व पनवेल शहर पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज दादा जरांगे पाटील उपोषणाला बसणार असल्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
बैठकीला पनवेल शहराचे असिस्टंट पोलीस कमिशनर भाऊसाहेब ढोले, नवीन पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घाडगे साहेब, पनवेल शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे उपस्थित होते.

सकल मराठा समाजाच्या वतीने रायगड समन्वयक विनोद दादा साबळे, पनवेल समन्वयक गणेश दादा कडू, तसेच रामदास शेवाळे, समाधान काशीद, राजश्री कदम, विजया मोहिते, कल्पना माने, रोहन कदम, विकास वरदे, राजू भगत, संतोष जाधव, सदानंद शिर्के, पराग मोहिते, यतीन देशमुख, सचिन भगत, राजू नलवडे, अल्पेज माने यांच्यासह पनवेलमधील अनेक मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान समाजाच्या मागण्या, उपोषणाची तयारी व कायदा व सुव्यवस्था याबाबत सविस्तर चर्चा झाली.

—