नवीन बातम्या
Gutenberg Times: The WordPress 7.2 release squad, WordCamp World, Playground meets WebMCP, and more—Weekend Edition 376
शेकाप व एकता असोसिएशनतर्फे आयुष्मान भारत, आभा कार्ड नोंदणी शिबिर २५० नागरिकांनी घेतला लाभ
महिला संघटन मजबूत करण्यावर निधी शिंदे यांचे मार्गदर्शन
गणेशोत्सवात वाहतुकीचे नियोजन; अतिक्रमण हटविण्यासाठी वाहतूक पोलिस रस्त्यावर पनवेल बाजारपेठेत कोंडी टाळण्यासाठी निर्बंध; ७० कर्मचारी, सात अधिकारी तैनात
श्रावणाच्या साजाला फॅशनचा तडका
‘द रॉयल-श्रावण व्होग’मध्ये कलागुणांचा जल्लोष
सिडकोच्या नोटिसांबाबत कायदेशीर लढ्याची तयारी
सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनीची बैठक संपन्न
बदलत्या भारताच्या शिक्षणाची नवी दिशा ठरणार
‘द स्कुल्स ऑफ इंडिया समिट २०२६’चे खोपोलीत आयोजन
Mumbai-3 September 2026(Ajit Mohite) RBI Dy Governor Addr at CII NBFC and HFC Summit
करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींची चालना!
पुढील तीन महिन्यांत विकासकामांना सुरुवात; मच्छीमारांच्या प्रश्नांना प्राधान्य

ऑल इंडिया एअरपोर्ट्स एव्हिएशन एम्प्लॉईज राष्ट्रीय युनियनचे उद्घाटन; सचिन केणी यांना सरचिटणीसपदाची संधी




4kNews कामोठे दि. 28
लोकनेते दि. बा. पाटील, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ,,येथे शिवसेना पुरस्कृत ऑल इंडिया एअरपोर्ट्स एव्हिएशन एम्प्लॉईज राष्ट्रीय युनियनच्या उद्घाटन व पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन मंगळवार, २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे.
या सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, गृह राज्यमंत्री योगेश कदम, खासदार श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, नरेश म्हस्के, उपसभापती सचिन अहिर, आमदार महेन्द्रशेठ थोरवे, महेन्द्रनाथ दळवी, मंगेश कुडाळकर, शिवसेना सचिव संजय मोरे, युवासेना निरीक्षक बाजीराव चव्हाण, शिवसेना उपनेते सुहास सामंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 


या नव्या युनियनच्या स्थापनेत सचिन केणी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून, विमानतळ प्रकल्पग्रस्त आणि एव्हिएशन क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांच्यावर संघटनेतील महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून सचिन केणी (चिंचपाडा), अमर म्हात्रे (उपसरपंच, उलवे) आणि बाळशेठ नाईक हे काम पाहत असून, कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी सर्व पदाधिकारी, प्रकल्पग्रस्त, कर्मचारी व शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top