नवीन बातम्या
महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ
काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांचा सपत्नीक सत्कार
उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न
विंधणे कोळीवाड्यात ‘एकविरा आई प्रसन्न’ मच्छीमार सहकारी संस्थेची स्थापना
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात पोलिसांचा रूट मार्च
अटल सेतूवरून विघ्नहर्ताची दिमाखदार स्वारी
भव्य महाआगमनाने कामोठे झाले ‘विघ्नहर्तामय’
माँसाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त तळोज्यात आयुष्मान-आभा कार्ड शिबिर
कळंबोलीकर तहानले; सिडकोविरोधात शिवसेना आक्रमक
राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत सी.के.टी. महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक
इनर व्हील क्लब ऑफ पनवेल. डिस्ट्रिक्ट ३१३; सीमेवरील जवानांसोबत रक्षाबंधन

*वेदनामुक्त आयुष्याचा नवा प्रवास; मेडिकव्हरच्या ‘मुव्हमेंटम २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद*


4kNews कामोठे दि 8
नवी मुंबई :* मेडिकव्हर हॉस्पिटल्सच्या जॅाईंट रोबो – रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटरतर्फे ‘मुव्हमेंटम २०२६’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सांध्यांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर यशस्वी पुनर्प्राप्ती केलेल्या रुग्णांना सन्मानित करत, त्यांना नव्याने मिळालेल्या शारीरीक हालचालींचा आनंद साजरा करणे आणि त्यांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांचा गौरव करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. 



या कार्यक्रमात विविध मनोरंजनात्मक खेळ, संगीत, फिजिओथेरपी सत्रे आणि आरोग्यविषयक संवाद अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे रुग्णांना हालचालीसाठी प्रोत्साहन मिळाले तसेच सांध्यांच्या आरोग्याबाबत जनजागृतीही करण्यात आली.
या कार्यक्रमाला मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे ऑर्थोपेडिक्स विभागाचे संचालक, रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन व अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद भोर यांच्यासह १०० हून अधिक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी उपस्थिती दर्शवली. प्रसिद्ध अभिनेत्री गौरी टोंक यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहून रुग्णांशी मनमोकळा संवाद साधला आणि सांध्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या या उपक्रमाला आपला पाठिंबा दर्शविला.*
या कार्यक्रमादरम्यान रोबोटिक-असिस्टेड सांध्यांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील प्रगती आणि पुनर्वसनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर पुन्हा आत्मविश्वासाने चालू लागलेल्या, हालचालींमध्ये सुधारणा झालेल्या आणि वेदनामुक्त, स्वतंत्र जीवन जगू लागलेल्या रुग्णांच्या प्रेरणादायी अनुभवांनाही याठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.



*यावेळी बोलताना डॉ. प्रमोद भोर म्हणाले,* वयोवृद्धांबरोबरच तरुणांमध्येही ऑस्टिओआर्थरायटिस, लठ्ठपणा, बैठी जीवनशैली, क्रीडा दुखापती आणि वयानुसार होणारी झीज यांमुळे सांध्यांचे विकार वाढत असल्याचे दिसून येत आहे. गुडघे किंवा नितंबातील सततची वेदना, सूज, स्नायुंमधील कडकपणा, चालताना येणाऱ्या अडचणी आणि हालचालींवरील मर्यादा ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. योग्य वेळी उपचार न केल्यास रुग्णांच्या जीवनमानावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
ते पुढे म्हणाले,* रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया ही प्रगत सांध्यांच्या विकारांवरील प्रभावी उपचारपद्धती ठरत आहे. या तंत्रज्ञानामुळे अधिक अचूक शस्त्रक्रिया, व्यक्तीनुसार उपचारांचे नियोजन, इम्प्लांट्स योग्यरित्या बसवणे, कमी रक्तस्त्राव, जलद पुनर्प्राप्ती आणि दीर्घकालीन चांगले परिणाम मिळतात. गुडघा व नितंब प्रत्यारोपणासह जटिल सांध्यांच्या शस्त्रक्रियांमध्येही या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे.



‘मुव्हमेंटम २०२६’ अंतर्गत ‘वॉक ऑफ कॉन्फिडन्स’, ‘सिट-टू-स्टँड चॅलेंज’, ‘स्लो वॉकिंग चॅलेंज’, फिजिओथेरपी सत्रे, रुग्णांचे सकरात्मक अनुभव आणि विविध संवादात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. आतापर्यंत १,००० यशस्वी रोबोटिक-असिस्टेड जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया पूर्ण करत रुग्णांना पुन्हा सक्रिय आणि निरोगी जीवन जगताना पाहणे ही आमच्यासाठी मोठी समाधानाची बाब आहे अशी प्रतिक्रिया डॉ. भोर यांनी व्यक्त केली.
मेडिकव्हर हॉस्पिटल्सच्या महाराष्ट्र व कर्नाटक विभागाचे प्रादेशिक संचालक नीरज लाल म्हणाले,* प्रगत तंत्रज्ञान, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि रुग्णकेंद्रित सेवा यांच्या माध्यमातून आम्ही अस्थिरोग विभाग अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. सर्वसमावेशक सांध्यांच्या आरोग्यसेवेद्वारे रुग्णांना अधिक चांगली हालचाल करण्याची शारीरक क्षमता आणि आरामदायी जीवन मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे. *मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबईचे सेंटर हेड संदीप जोशी म्हणाले,* रुग्णांनी त्यांच्या पुनर्प्राप्तीचा प्रवास साजरा करावा, तज्ज्ञांशी संवाद साधावा, सांध्यांच्या आरोग्याविषयी अधिक जाणून घ्यावे आणि इतर रुग्णांच्या प्रेरणादायी अनुभवांतून बळ मिळवावे, या उद्देशाने ‘मुव्हमेंटम २०२६’चे आयोजन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top