नवीन बातम्या
महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ
काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांचा सपत्नीक सत्कार
उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न
विंधणे कोळीवाड्यात ‘एकविरा आई प्रसन्न’ मच्छीमार सहकारी संस्थेची स्थापना
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात पोलिसांचा रूट मार्च
अटल सेतूवरून विघ्नहर्ताची दिमाखदार स्वारी
भव्य महाआगमनाने कामोठे झाले ‘विघ्नहर्तामय’
माँसाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त तळोज्यात आयुष्मान-आभा कार्ड शिबिर
कळंबोलीकर तहानले; सिडकोविरोधात शिवसेना आक्रमक
राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत सी.के.टी. महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक
इनर व्हील क्लब ऑफ पनवेल. डिस्ट्रिक्ट ३१३; सीमेवरील जवानांसोबत रक्षाबंधन

धरणा गावातील गटारपाण्याच्या समस्येवर माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने तातडीने उपाययोजना

4kNews कामोठे दि. 8

पनवेल (प्रतिनिधी)  पनवेल तालुक्यातील धरणा गावामध्ये नाल्यातील गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत होती. विशेषतः आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या समस्येची गांभीर्याने दखल घेत ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष तथा रोहिंजन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. आणि त्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आली. 



यावेळी माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांनी नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून पुढील काळातही आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही दिली. गावातील स्वच्छता, आरोग्य आणि विकासाच्या दृष्टीने अशा समस्यांचे तातडीने निराकरण करणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी महानगरपालिकेचे कर्मचारी, सुरेश पोरजी, नेहाल ठाकूर, उमेश मढवी, काथोर मढवी, सूरज पाटील, हनुमान पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top