नवीन बातम्या
पनवेलमध्ये साडेनऊ लाखांची वीज चोरी उघड; एकावर गुन्हा दाखल
सेनेची बांधणी अधिक मजबूत करण्याासाठी पनवेलमध्ये बैठक संपन्न

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135 वा जयंती महोत्सव पनवेल शहरामध्ये संपन्न
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पनवेल महानगरपालिकेची शिवसेना शाखा तोड कारवाई परतावली
शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष बालसंस्कार वर्ग संपन्न
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा धामापूरकर यांना बढती
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था (केजीपी) संचलित शाळांचा १२ वी चा निकाल १०० %
बंबई पाडा परिसरात आढळला एका महिलेचा संशयास्पद मृतदेह 
सुकापूर येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भव्य हळदीकुंकू कार्यक्रम व व्याख्यान संपन्न

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत श्रावण सोमवारी शिवभक्तांना २०० किलो खिचडी व ५०० डझन केळी वाटप



पनवेल, २८ जुलै: 4k समाचार संजय कदम
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी खांदा कॉलनीतील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त खांदेश्वर मंदिरात शिवभक्तांसाठी भव्य अल्पोपहार वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात २०० किलो साबुदाणा खिचडी आणि ५०० डझन केळी अशा उपवासाच्या फराळाचे वितरण करण्यात आले.



या उपक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष उपस्थितीमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्यांच्या हस्ते या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आमदार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजोपयोगी कार्यांची सातत्याने अंमलबजावणी होत असून, या कार्यक्रमातूनही त्यांचे सामाजिक भान आणि शिवभक्तांविषयीचा आदर प्रकर्षाने जाणवला.



श्रीराम पतसंस्थेचे तुर्भे, नवी मुंबईचे अध्यक्ष रामदासशेठ पिंगळे, उपाध्यक्ष हनुमंत शेटे, शाखा सल्लागार ओंकारशेठ गावडे, तसेच शाखा सल्लागार मांगिलाल चौधरी, अर्चना खंडागळे, व्यवस्थापक राकेश भैय्ये आंदीनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.



कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे, शिवसेना शहरप्रमुख सदानंद शिर्के यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. 



हजारो शिवभक्तांनी या फराळ वाटपाचा लाभ घेत श्रीराम पतसंस्थेच्या उपक्रमाचे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीचे विशेष कौतुक केले. उत्तम दर्जाचा फराळ आणि उत्कृष्ट व्यवस्थापन यामुळे कार्यक्रम भाविकांच्या मनात घर करून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top