पनवेल दि.19 (वार्ताहर) ः कारवरील ताबा सुटल्याने कारचालकाने पुढे जाणार्या पिकअपला पाठीमागून ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. या अपघातात वाहनाचे नुकसान झाले आहे.

मुंबई – पुणे एक्सप्रेस वे मुंबई लेनवर किमी 2.600 येथे खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत हा अपघात झाला आहे.
टेम्पो पिकअप क्र. एम एच 46 बीएम 6998 यावरील चालक मच्छिंद्र नामदेव जाधव (वय 65 रा. सेक्टर 14 कळंबोली) हे कळंबोली ते पनवेल असे जात असताना पुणे लेन किमी 2/600 या ठिकाणी तिसरे लेन वरून पहिल्या लेनला घेऊन जात असताना मागून येत असणारी स्विफ्ट कार क्र.एम एच 03 डिव्ही 0814 यावरील चालक बालाजी आंधळे (वय 30 रा. लोणी जि.पुणे) यावरील चालक याचा कार वरून ताबा सुटल्याने पुढील पिकअपला पाठीमागून धडक मारली. आणि जोरात अपघात झाला.

यात दोघे जण जखमी झाले. या ठिकाणी वाहतूक पोलीस व पळस्पे मोबाईल कर्मचारी व आयआरबीचे कर्मचारी हजर होते. कार अपघातातील जखमी शुभम सिंग व अंकिता सिंग यांना डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना आय आर बी अॅम्बुलन्स ने एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे पाठवण्यात आलेले आहे.
