पनवेल दि.19 ( 4kNews) ः खारघर वसाहतीमध्ये लागलेली आग राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रमजान शेख यांच्या तत्परतेमुळे अग्नीशमन दलाला विझविण्यात यश मिळाले आहे.

खारघरमधील फरशीपाडा सेक्टर 34 इंटरनॅशनल फुटबॉलच्या आवारात भीषण आग लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते व होपमिरर फाऊंडेशनचे संस्थापक रमजान शेख हे कार्यालयातून घरी जात असताना त्यांनी हे दृश्य पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ सिडको अग्निशमन दलाला फोन करून तातडीने येण्यास सांगितले.

जास्त वेळ वाया न घालवता सिडको अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून काही वेळातच आग आटोक्यात आणली. यावेळी मदतीसाठी मिराज शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 3 अध्यक्ष शेहबाज शेख, सोहेल शेख आदी उपस्थित होते.

वेळ वाया न घालवता आग विझवण्यात सिडको अग्निशमन दलाने तत्पर सहकार्य केल्याबद्दल रमजान शेख यांनी सिडको अग्निशमन दलाचे आभार मानले
