नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते न्हावेखाडी मधला पाडा येथे शिव मंदिर जीर्णोद्धार सोहळा

पनवेल (प्रतिनिधी) तालुक्यातील न्हावेखाडी मधला पाडा येथे शिव मंदिर जीर्णोद्धार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कैलासवासी मुक्ताबाई मोकल आणि नागेश मोकल यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या श्री शिव मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा आणि श्रींची पुनः प्रतिष्ठापना आज (सोमवारी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली.


सावळाराम मोकल आणि कुसुम मोकल यांनी स्वखर्चातून बांधलेल्या शिव मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा विविध धार्मिक कार्यक्रम राबवून संपन्न झाला. रविवारी श्री गणेश पूजन, देव मूर्तीची मिरवणूक, शुद्धीकरण, भजन, महाप्रसाद तर सोमवारी होम, कलश, घंटा दीप आणि ध्वजपूजन , मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, महानैवेद्य अशा कार्यक्रमांचा आयोजन यावेळी करण्यात आले होते.

या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते वाय.टी देशमुख, उद्योजक जे. एम. म्हात्रे, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, साई डेव्हलपर्सचे विजय कडू, ग्रामपंचायत सदस्य सागर ठाकूर, सुनिता भोईर, रंजना पाटील, जागृती म्हात्रे, अरुणशेठ ठाकूर, सी.एल ठाकूर, चंद्रकांत भोईर, मंजुषा ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान नरेश मोकल, विलास मोकल, संदीप मोकल यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top