नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

करंजाडेमध्ये दुर्गामाता मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा
गणेशगिरी महाराजांच्या हस्ते होणार देवीची प्राणप्रतिष्ठा

4k समाचार
पनवेल/प्रतिनिधी:* करंजाडे येथे प.पू. गगनगिरी महाराज व स्व. सदाशिव तुकाराम साबळे यांच्या आशिर्वादाने 8 ऑगस्ट  ते 10 ऑगस्ट  श्री दुर्गामाता मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी गगनगिरी महाराजांचे शिष्य गणेशगिरी महाराज यांच्या हस्ते  देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याचे आयोजक विनोद साबळे यांनी सांगितले.


करंजाडे येथे स्व.सदाशिव साबळे यांनी प.पू.गगनगिरी महाराज यांच्या आशिर्वादाने दुर्गा मातेचे मंदिर सन 2000 साली उभारले.या  मंदिराला 25 वर्षे पूर्ण झाली.त्यामुळे हे मंदिर जीर्ण झाले होते.त्यामुळे साबळे परिवाराने या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे ठरवले.यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. 8 ऑगस्ट 2025 रोजी गणेश पूजन , पुण्याह वाचन इत्यादी नामस्मरणाने या कार्यक्रमाची सुरूवात होणार आहे.9 ऑगस्ट ला सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत होम हवन होणार आहे सायंकाळी पाच ते सात देवीची दिंडी सोहळा मिरवणूक काढण्यात येणार आहे.

या वेळी आरिवली येथील गावदेवी भजनी भारूड मंडळाचे दिंडी भजन होणार आहे तर रात्री 9 वाजता आदई येथीलदत्त प्रासादिक भजन मंडळाचे  संगीत भजन आयोजित करण्यात आले आहे.तर रविवार 10 ऑगस्ट रोजी कलशारोहण व प्राणप्रतिष्ठा होणार आहे. 

या दिवशी सकाळी 7 ते 9 या वेळेत गगनगिरी महाराजांचे शिष्य गणेशगिरी महाराज यांच्या हस्ते देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व पूर्णाहुती 11:00 वाजता महाआरती होणार आहे.तर दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत तीर्थ प्रसाद व महाप्रसादाचे आयोजन आहे.यावेळी चिंचवली शेकीन येथील माऊली भजन मंडळ चिंचवलीचे भजन होणार आहे.करंजाडेतील ग्रामपंचायत कार्यालयासमोर हा सोहळा पार पडणार असून या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन विनोद साबळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top