4k समाचार
नवी मुंबई, दि. 15 – सीबीडी परिसरात एका तोतया पोलीस अधिकाऱ्याने ८२ वर्षीय परशुराम नारायण परब यांची फसवणूक करून सोन्याची चैन चोरल्याची घटना घडली. सरोवर विहार परिसरातून जात असताना आरोपीने स्वतःला पोलीस सब इन्स्पेक्टर असल्याचे सांगितले.

खून झाल्याचा बनाव करून परब यांना त्यांच्या सोन्याची चैन पिशवीत ठेवण्यास सांगून हातचलाखीने ती चोरून नेली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच परब यांनी सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
