नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

चाईल्ड केअर सामाजिक संस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न .




4k समाचार 15
उरण (विठ्ठल ममताबादे )चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगडची रविवार दिनांक १४/९/२०२५ रोजी वार्षिक महत्वाची सभा संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष  विकास कडू यांच्या अध्यक्षतेखाली मोठया उत्साहात संपन्न झाली.सभे मध्ये विविध विषयावर चर्चा झाली.नवदुर्गा सम्मान रायगड,विशेष सम्मान रायगड हे पुरस्कार वितरण सोहळा श्री रत्नेश्वरी मंदिर येथे होणार आहे,संस्थेचा ९ वर्धापण दिन मोठ्या उत्साहाने संपन्न करण्यात येणार आहे,९व्या वर्धापन दिन निमित्य रायगड मध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना रायगड रत्न हा पुरस्कार देण्यात येणार आहेत,उरण, पनवेल, पेण,कर्जत, अलिबाग, महड या तालुक्यात विशेष कार्य करणाऱ्यांना तालुका रत्न हा पुरस्कार देण्यात येणार आहे.असे आदी निर्णय एकमताने घेण्यात आले.सभे मध्ये संस्थेची प्रामुख्याने फेर निवड झाली. प्रकाश ठाकूर (धुतम, उरण)यांची मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली
तर सह सचिव पदी सचिन गावंड (पेण)यांची निवड करण्यात आली. तसेच  हितेश म्हात्रे (जसखार, उरण)यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.सर्व नवनिर्वाचीत पढाधिकाऱ्यांना संस्थेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी शुभेच्छा दिल्या. 



सभेची प्रस्थावना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास कडू यांनी केली.ते सभासदांना मार्गदर्शन करताना म्हणाले की समाज सेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य लक्षात घेऊन ह्या चाईल्ड केअर सामाजिक संस्था ची स्थापना केली, सुरुवातीला ही संस्था फक्त उरण तालुक्या मर्यादित काम करत राहिली नंतर संस्थेने संपूर्ण रायगड जिल्ह्यात समाजसेवेचे कार्य सुरु केले, आज ही संस्था रायगड नव्हे तर महाराष्ट्र भर गाजत आहे.तसेच पेण तालुका अध्यक्ष कैलासराजे घरत यांनी सभेला मार्गदर्शन करताना खूप मोलाचे सल्ले दिले चाईल्ड केअर सामाजिक संस्था ही संस्था नवाव्या वर्षात पदार्पण करत आहे. कुठल्याही संस्थेला ९ वर्ष झाली म्हणजे त्या संस्थेचे कार्य आफाट आहे. त्या त्या बद्दल संस्थेच्या पदाधिकारी सदस्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. तसेच सभासदांनी या संस्थेसाठी थोडा फार तरी वेळ काढावा ही विनंती करतो


आपण सामाज्याची काही तरी देणे लागतो त्या नुसार प्रत्येकाने खारू ताई च्या रूपाणी का होईना समाजसेवेत सहभाग घ्यावा.असे आवाहन कैलासराजे घरत यांनी केले.सभेचे आभार प्रदर्शन विवेक पाटील यांनी केले.
या सभेसाठी विविध तालुक्यातून पदाधिकारी सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी विकास कडू,विवेक पाटील,विक्रांत कडू,मनोज ठाकूर,प्रकाश ठाकूर,रोशन घरत,कैलास राजे घरत,विनायक म्हात्रे,विजेंद्र पाटील,राजेश ठाकूर,विश्वनाथ घरत,भूषण कडू,समीर पाटील,धीरज घरत,सचिन गावंड,हितेश म्हात्रे,विवेक कडू,भूषण भोईर,विपुल कडू,आमोल डेरे आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.अशा प्रकारे चाईल्ड केअर सामाजिक संस्थेची वार्षिक सभा अत्यंत उत्साहात, खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top