नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण



पनवेल (4kNews) सामाजिक क्षेत्रात हिरीरीने अग्रस्थानी असणारी पत्रकारांची नोंदणीकृत संस्था म्हणजे पनवेल तालुका पत्रकार विकास मंच. संस्थेच्या प्रथेनुसार नूतन कार्यकारिणीने आज (दि. १६) शिर्डी येथे श्री साईबाबांचे दर्शन घेऊन पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या सर्व सदस्यांना ओळखपत्रे प्रदान करण्यात आली.


  

ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पत्रकारांचा सहभाग असलेली पनवेल तालुका पत्रकार विकास मंच या संस्थेमध्ये बिनविरोध पदाधिकारी निवडून देण्याची प्रथा आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख उपक्रम केले जातात. आगामी वर्षभरातील वार्षिक कार्यक्रमांचे वेळापत्रक अध्यक्ष मंदार दोंदे यांनी शिर्डी अभ्यास दौऱ्यामध्ये प्रसिद्ध केले. नूतन ओळखपत्रांचे अनावरण झाल्यानंतर प्रत्येक सदस्यांना ते प्रदान करण्यात आले. विद्यमान वर्षामध्ये अध्यक्षस्थानी मंदार दोंदे, उपाध्यक्षपदी राजेंद्र पाटील, खजिनदार पदावर संजय कदम तर सरचिटणीस म्हणून हरेश साठे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.


शिर्डी येथे झालेल्या कार्यक्रमात सर्व सदस्यांना पत्रकारितेस उपयुक्त असणाऱ्या मंत्रिमंडळ संपर्क क्रमांक यादी, मंत्री महोदयांचे स्वीय सचिव व ओएसडी यांची संपर्क यादी, सचिवालयातील प्रमुख व्यक्तींच्या संपर्क क्रमांकांची यादी, वार्षिक वेळापत्रक आणि भेटवस्तू देण्यात आली.

पुढील दोन महिन्यांमध्ये पनवेल तालुका पत्रकार विकास मंच विनामूल्य नेत्र शिबिर घेणार असल्याची घोषणा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केली तर खजिनदार संजय कदम यांनी ६ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करणार असल्याचे सांगितले. यावेळी सल्लागार विवेक मोरेश्वर पाटील, अध्यक्ष मंदार दोंदे, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, खजिनदार संजय कदम, सदस्य दत्तात्रय कुलकर्णी, दिपक घोसाळकर,प्रवीण मोहोकर,राजू गाडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top