नवीन बातम्या
महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ
काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांचा सपत्नीक सत्कार
उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न
विंधणे कोळीवाड्यात ‘एकविरा आई प्रसन्न’ मच्छीमार सहकारी संस्थेची स्थापना
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात पोलिसांचा रूट मार्च
अटल सेतूवरून विघ्नहर्ताची दिमाखदार स्वारी
भव्य महाआगमनाने कामोठे झाले ‘विघ्नहर्तामय’
माँसाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त तळोज्यात आयुष्मान-आभा कार्ड शिबिर
कळंबोलीकर तहानले; सिडकोविरोधात शिवसेना आक्रमक
राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत सी.के.टी. महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक
इनर व्हील क्लब ऑफ पनवेल. डिस्ट्रिक्ट ३१३; सीमेवरील जवानांसोबत रक्षाबंधन

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने कामोठे   वसाहतीमधील  सतत खंडित होत असलेल्या विद्युत पुरवठ्याबाबत  विचारला अधिकाऱ्यांना जाब   


पनवेल, दि . ०8 ( वार्ताहर ) : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने कामोठे वसाहतीमधील  सतत खंडित होत असलेल्या विद्युत पुरवठ्याबाबत आज संबधीत अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे .  
   शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे  सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण व जिल्हाप्रमुख दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर प्रमुख ॲड. समाधान काशीद, उपमहानगर प्रमुख प्रभाकर गोवारी कामोठे शहर प्रमुख रामदास गोवारी, कामोठे उपशहर प्रमुख गणेश खांडगे व राहुल यादव  पदाधिकारी आणि महावितरण अधिकारी यांच्या उपस्थितीत कामोठे मधील सतत खंडित होत असलेल्या विद्युत पुरवठा संदर्भात बैठक पार पडली. यावेळी महावितरनाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता वेंकटेश कासल , बकुल मानवटकर ,संतोष पालवे, संजय मुंडे, सुजीत पाटील, 


अभिजित साळवी हे उपस्थितीत होते. सदर बैठकीत महावितरणच्या चुकीच्या धोरणामुळे व कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच सतत कामोठेमध्ये खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत यावेळी श्री कासल यांनी कामोठ्याच्या लोड शेडिंगची समस्या एका आठवड्याच्या आत संपणार असल्याचे व पर्याय व्यवस्था उपलब्ध करत असल्याचे सांगण्यात आले व यापुढे नैसर्गिक कारणा व्यतिरिक्त कामोठे येथील लाईट बंद करणार नसल्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच जरी लाईट बंद करणार असल्यास किंवा अचानक लाईट बंद केल्यास त्वरित ग्राहकांना सूचना देण्यात येईल असे सुद्धा आश्वासन देण्यात आले. यावेळी पावसाळ्या अगोदर संपूर्ण कामोठे शहरांमधील ज्या ज्या ठिकाणी झाडांच्या फांद्या वाढल्या मुले लाईटला धोकादायक असेल याची पेट्रोलिंग करून माहिती घेण्यास सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top