नवीन बातम्या
आदर्श सरपंच सौ. निकिता संदीप पाटील यांचा ‘सह्याद्रीरत्न गुणवौरव सन्मान २०२६’ ने गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य जनआरोग्य शिबिर; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

इनरव्हील क्लब ऑफ पनवेलची दैदिप्यमान कामगिरी; तब्बल १० बक्षिसांचा मान
पॅरा गेम्स आणि आशियाई पॅरा गेम्ससाठी भारतीय पॅरा-खेळाडूंना मिळणार एसबीआय लाईफचे बळ
लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये “ऋतू हिरवा” अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन
पनवेल शहर पोलिसांची मोठी कारवाई; बनावट कागदपत्रांच्या आधारे २.२९ कोटींची जमीन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
मानवता फाउंडेशनतर्फे दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना छत्री वाटप; वृक्षारोपणातून निसर्ग संवर्धनाचा संदेश
*वर्षावास निमित्त धम्म बांधवांची गृह भेट उपक्रम*
पनवेलच्या विकास आराखड्याला गती; नगररचना संचालकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक


इनरव्हील क्लब ऑफ पनवेलची दैदिप्यमान कामगिरी; तब्बल १० बक्षिसांचा मान

4kNews कामोठे दि. 2
पनवेल (प्रतिनिधी) नुकत्याच पुणे येथे इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१३ ची वार्षिक डिस्ट्रिक्ट असेंब्ली मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडली. या सोहळ्यात सन २०२६-२७ या वर्षासाठी डिस्ट्रिक्ट चेअरमन म्हणून डॉ. दीपशिखा पाठक यांच्या पदग्रहणाचा समारंभ संपन्न झाला. राज्यभरातील इनरव्हील क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात गतवर्षी उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या क्लबांचा गौरव करण्यात आला. यामध्ये इनरव्हील क्लब ऑफ पनवेलने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तब्बल दहा बक्षिसे पटकावत विशेष मान मिळविला.



सन २०२५-२६ या वर्षभरात शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, सामाजिक जनजागृती तसेच गरजू घटकांसाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविल्याबद्दल इनरव्हील क्लब ऑफ पनवेलला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. क्लबच्या अध्यक्षा शुभांगी शिरीष पिंपळकर आणि सचिव डॉ. अमृता सुमुख नाईक यांना त्यांच्या उत्कृष्ट नियोजन, प्रभावी नेतृत्व आणि वर्षभरातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘बेस्ट प्रेसिडेंट-सेक्रेटरी जोडी’ हा प्रतिष्ठेचा पारितोषिक प्रदान करण्यात आला. तसेच क्लबच्या  एडिटर सौ. वर्षा प्रशांत ठाकूर यांना प्रभावी कार्याबद्दल ‘बेस्ट एडिटर’ पारितोषिकाने गौरविण्यात आले.



क्लबने राबविलेल्या ‘हॅपी स्कूल’ या महत्त्वपूर्ण उपक्रमाचीही विशेष दखल घेण्यात आली. या उपक्रमासाठी अध्यक्षा शुभांगी पिंपळकर यांना विशेष पदक प्रदान करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक योगदान आणि विद्यार्थ्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या सुविधांमुळे हा उपक्रम जिल्हास्तरावर विशेष ठरला.याशिवाय वर्षभर विविध समाजोपयोगी प्रकल्प यशस्वीपणे राबविल्याबद्दल इनरव्हील क्लब ऑफ पनवेलला विशेष ट्रॉफी प्रदान करण्यात आली. गतवर्षभरात केलेल्या विविध उपक्रमांची प्रशंसा म्हणून क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांना अनेक प्रशस्तीपत्रे आणि सन्मानचिन्हेही देण्यात आली.



एकूण दहा पुरस्कार प्राप्त करून इनरव्हील क्लब ऑफ पनवेलने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. क्लबच्या या यशामुळे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आगामी वर्षातही अधिक व्यापक स्वरूपात समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.यावेळी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी या यशाचे श्रेय सर्व सदस्यांच्या एकजुटीला, सातत्यपूर्ण सेवाभावाला आणि समाजहितासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांना दिले. समाजसेवेची ही परंपरा अधिक बळकट करत शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि सामाजिक विकासाच्या विविध क्षेत्रांत आगामी काळातही प्रभावी प्रकल्प राबविण्याची प्रेरणा या सन्मानामुळे मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या उल्लेखनीय यशाबद्दल इनरव्हील क्लब ऑफ पनवेलच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांवर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top