4k समाचार
उरण दि 25 (विठ्ठल ममताबादे )
केळ्याचे माल अभिनव सेवा सहकारी संस्था मर्या.चिरनेर यांच्या वतीने सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे आयोजन यावर्षी करण्यात करण्यात आले आहे.शारदा नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून बुधवारी ( दि २४ ) अतिदुर्गम भागातील केळाचा माल या आदिवासी वाडीवरील महिलांना अनंत नारंगीकर यांच्या कुटुंबियांच्या वतीने सामाजिक जीवनाशी बांधिलकी जपत साड्यांचे वाटप करण्यात आले.

ग्रामदैवत – आदिशक्तीचा जागर सोहळा तथा शारदा नवरात्रौत्सव शहर तसेच ग्रामीण भागात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात आहे.यावर्षी शारदा नवरात्रौत्सव हा सोमवारी ( दि २२) आल्याने सालाबादप्रमाणे यंदाही नवरात्रौत्सव मंडळाने आप आपल्या शहरात,गाव परिसरात घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्री दुर्गादेवी, महिषासुरमर्दिनीची मोठ्या भक्तिभावाने पुजा अर्चा करून प्राणप्रतिष्ठा केली आहे.यामुहूर्ताचे औचित्य साधून चिरनेर केळाचा माल या अतिदुर्गम भागातील आदिवासी महिलांना साड्यांचे वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अनंत नारंगीकर,सौ वंदना अनंत नारंगीकर यांच्या कुटुंबियांनी हाती घेतले.

यावेळी केळ्याचे माल अभिनव सेवा सहकारी संस्थचे पदाधिकारी दत्ता कातकरी, अशोक कातकरी, सुरेश कातकरी, रोहित कातकरी, श्रीकांत कातकरी,राम कातकरी, राम कातकरी यांच्या उपस्थितीत कविता अशोक कातकरी ,वैशाली गुरुनाथ कातकरी,किर्ती रोहित कातकरी,बेबी रामा कातकरी,अमिषा अश्विन कातकरी,देवकी दत्ता कातकरी,लता दशरथ कातकरी,गुलाब सुरेश कातकरी,रुपाली अजय कातकरी सह इतर आदिवासी बांधव, महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.या समाजाभिमुख कार्यक्रमांचे औचित्य साधून आदिवासी महिलांनी वंदना अनंत नारंगीकर यांच्या कुटुंबीयांचे कौतुक केले आहे.
