नवीन बातम्या
*नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ*
महाराष्ट्र सरकारने चवदार तळे परिसराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 57 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विशेष आभार
इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबचा हॅपी स्कूल प्रोजेक्ट
पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लालचंद यादव  यांची बिनविरोध निवड
पहाटे वाहनांना आग
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार

हिंदु संस्कृती जपण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून शिवशक्ती मित्र मंडळामार्फत केले जात आहे ः रायगड भूषण रमेश गुडेकर


पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः हिंदु संस्कृती जपण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून शिवशक्ती मित्र मंडळामार्फत केले जात आहे. यासाठी सातत्याने परिसरात हिंदु सण, उत्सव सर्वजण एकत्रित येवून मोठ्या उत्साहात साजरा करतात. हेच या मंडळाचे वैशिष्ट्य असल्याचे मत मा.नगरसेवक व रायगड भूषण, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रमेश गुडेकर यांनी बक्षिस समारंभ कार्यक्रमाच्या वेळी व्यक्त केले.


या कार्यक्रमास डॉ.अजिंक्य प्रकाश पाटील, उद्योजक राजाभाऊ गुप्ते, ज्येष्ठ पत्रकार व जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश चिटणीस सुनिल पोतदार, पत्रकार व रायगड प्रेस क्लब जिल्हा सल्लागार संजय कदम, युवा उद्योजक स्वप्निल गुप्ते, ज्येष्ठ शिवसैनिक अरुण ठाकूर, अध्यक्ष संदीप पाटील, रवी (पिंट्या )गोरे, मा.नगरसेविका श्रीमती नीता प्रदीप नरसाळे, शहर संघटीका अर्चना कुलकर्णी, सौ. पूजा पंकज पडवळ आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना गेल्या अनेक वर्षापासून शिवशक्ती मित्र मंडळ सातत्याने समाजोपयोगी कार्यक्रम करीत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुण पिढी येथे आकर्षित झाली असून ते प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

तर उद्योजक राजाभाऊ गुप्ते यांनी सुद्धा मंडळाचे कौतुक करून हे मंडळ म्हणजे पनवेलचा जिता-जागता इतिहास आहे. येथे प्रत्येक सण, उत्सव साजरे केले जातात व त्यात सर्वांचा सहभाग असतो हे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर जनता दल सेक्युलर पक्षाचे चिटणीस सुनील पोतदार यांनी सांगितले की, राजकारण विरहित हे मंडळ असून आमचे पक्ष वेगवेगळे असले तरी रमेश गुडेकर, अरुण ठाकूर यांची मैत्री ही जुनी आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या अडीअडचणीला आम्ही धावून जात असतो असे त्यांनी सांगितले. तर रायगड प्रेस क्लबचे सल्लागार संजय कदम यांनी सुद्धा या मंडळाचे कौतुक करून पत्रकारितेच्या माध्यमातून या मंडळाची कार्य नेहमीच समाजापुढे आम्ही आणत असतो. यापुढे सुद्धा त्यांनी अशाच प्रकारे समाजोपयोगी कार्यक्रम करावेत अशा शुभेच्छा दिल्या.

तर युवा उद्योजक स्वप्नील गुप्ते यांनी सुद्धा या मंडळाचे कौतुक करताना तरुण पिढीला नोकरी व्यवसायासाठी कोणतीही मदत करण्यासाठी आपण सदैव तयार असल्याचे त्यांनी सांगितले. दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या लाईन आळी येथील शिवशक्ती मित्र मंडळातर्फे होळी तसेच शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचा बक्षिसाचा समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत व हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मार्गदर्शक रमेश गुडेकर, संस्थेचे अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष रवि (पिंट्या) गोरे, कार्याध्यक्ष खंडेश धनावडे, समीर कदम, सहकार्याध्यक्ष प्रकाश (नानु) वाघे, सहकार्याध्यक्ष प्रवीण पोवार, खजिनदार संतोष तळेकर, हिशोब तपासनीस अरुण ठाकूर, संयुक्त चिटणीस प्रशांत नरसाळे, सहखजिनदार अनिकेत जाधव आदींनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top