सन्माननीय रिपाइं नेते नरेंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुलै २०२६ संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले

4kNews कामोठे

आज दिनांक २४/०७/२०२६ रोजी सन्माननीय रिपाइं नेते नरेंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुलै २०२६ संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडघर येथे वृक्षारोपण चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

हा कार्यक्रम स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय महेश साळुंखे यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी संचालक आयु. सचिन कांबळे बौध्दजन पंचायत समिती पनवेलचे अध्यक्ष आयु. विजय गायकवाड  धम्मरत्न बौद्धांचार्य आयु. हिरामण जोशी तसेच शाळेचे मुख्याध्यापक जयदास घरात त्यांचे सहकारी शिक्षक वर्ग पालक आणि शाळेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top