4kNews कामोठे दि. 24
पनवेल (प्रतिनिधी) : पनवेल ग्रामीण भागातील ज्येष्ठ शिवसैनिकांची बैठक शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी वावंजे येथे पार पडली. या बैठकीत ग्रामीण भागातील विविध नागरी सुविधा आणि स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीला शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख दीपक निकम आणि उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शांताराम कुंभारकर, बबन फडके, दत्ता फडके, विष्णू भोईर, शशी भगत, ज्ञानेश्वर माळी, परशुराम गायकर, एकनाथ बोंडे, मनोज कुंभारकर, संदीप पाटील, तुळशीराम मुकादम, संतोष वालपकर, आनंद वालपकर, जगन्नाथ म्हात्रे, प्रमोद पाटील, रामदास गोंधळी, भालचंद्र तसेच कळंबोलीचे विभागप्रमुख विश्वास पेटकर आणि शैलेश चव्हाण उपस्थित होते.

शिवसैनिकांचा उत्साह पाहून जिल्हाप्रमुख दीपक निकम यांनी उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांच्या सहकार्याने ग्रामीण भागातील प्रश्नांकडे विशेष लक्ष देऊन ते सोडविण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

