नवीन बातम्या
ड्राइव्ह सेफ ३६०’ अभियानातून रस्ते सुरक्षेचा संदेश
रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘मराठी माझी देवालाही आवडे’ कार्यक्रम संपन्न
रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत संतगीतांचा सुरेल सोहळा; महापौर नितीन पाटील यांचा सन्मान
तरुणी बेपत्ता; पनवेल तालुका पोलिसांकडून शोध सुरू
विजय साबळे बेपत्ता; कामोठे पोलिसांत नोंद
शिवसेनेच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
१.२२ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत
सात पोलीस ठाण्यांतील ४८ गुन्ह्यांची उकल; १४० मोबाईल, दागिने, आठ वाहने आणि रोकड हस्तांतरित
क्रांती सम्राट’च्या संपादिका दिपालीताई पारसकर यांना ‘न्यायसखी पुरस्कार’ महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते कळंबोलीत सन्मान
पनवेलमध्ये ३० हजारांच्या पितळी समयांची चोरी; एकाला अटक
‘गावाच्या विकासासाठी ग्रंथालय उभारणे आवश्यक’
डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन

पनवेलमध्ये ३० हजारांच्या पितळी समयांची चोरी; एकाला अटक


4kNews कामोठे
पनवेल शहर पोलिसांची कारवाई; दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू
पनवेल, दि.  23(संजय कदम) : पनवेल कापड बाजारातील महालक्ष्मी मेटल मार्टमधून ३० हजार रुपये किमतीच्या दोन मोठ्या पितळी समयांची चोरी केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. अर्जुन गायकवाड (वय ३५, रा. अंबरनाथ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे.



या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता, २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.



वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथकात पोलीस नाईक अनिल चव्हाण, पोलीस शिपाई साईनाथ मोकल, अभिजित गडकरी, दत्ता जाधव, सचिन कोर तसेच महिला पोलीस शिपाई भगत आणि सवार यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top