नवीन बातम्या
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.
करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!
*केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्यामंदिरात रेनकोट व छत्री वाटप*
*आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक*
माची प्रबळगडावर रस्ता चुकलेल्या दोन अल्पवयीन पर्यटकांची सुखरूप सुटका.
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ
उरण महाविद्यालयात जपानी भाषा  प्रशिक्षणाची सुरुवात.
महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा. महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी.
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.

दलित पॅन्थरचे तृतीय शहीद वसंत मोरे धामणकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त  कार्यक्रमाचे आयोजन



मुंबई : दि. 28
दलित पॅन्थर चळवळीतील तृतीय शहीद वसंत मोरे धामणकर यांच्या पन्नासाव्या स्मृतीदिनानिमित्त एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी, भगवान बुद्ध विहार, पटागण भिमवाडा, खिरा नगर समोर, सांताक्रूझ (प.), मुंबई – 400054 येथे पार पडणार आहे. 



सदर स्मृतीदिनाचे अध्यक्षस्थान मा. विवेक गोविंदराव पवार हे भूषविणार असून, या कार्यक्रमाला आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते आणि साहित्यिक आयु. ज. वि. पवार, आयु. सुरेश सावंत, आयु. सुमेध जाधव, ऍड. उत्तम जहागीरदार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.



वसंत धामणकर स्मृती समिती, मुंबई यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, दलित पॅन्थर चळवळीतील सर्व कार्यकर्ते, अनुयायी आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहीद वसंत धामणकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन समितीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top