नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन


परळी विभाग बौद्ध विकास संघाचा धम्म मेळावा १६ नोव्हेंबरला; कामोठे येथील नालंदा बुद्ध विहारात ६९वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात”


4k समाचार  दि. 16
कामोठे, नवी मुंबई : परळी विभाग बौद्ध विकास संघ, मुंबई–ग्रामीण (ता.–जि. सातारा) यांच्या विद्यमाने ६९वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व धम्म मेळावा रविवार, १६ नोव्हेंबर २०२५ रोजी नालंदा बुद्ध विहार, कामोठे येथे आयोजित करण्यात आला आहे. धम्म बांधव व भगिनींनी शुभ्रवस्त्र परिधान करून वेळेवर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 



कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता चहा–नाश्ता याने होणार असून पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण सकाळी १० वाजता करण्यात येईल. त्यानंतर धम्म वंदना, अर्दशांची पूजा व स्वागत सत्कार पार पडेल. धम्म मेळाव्याचे उद्घाटन सकाळी १०.३० वाजता होणार असून विविध मान्यवर धम्मदेशना करणार आहेत.
धम्म प्रवचनाचा विषय : “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती” असे असून ते सकाळी १२ वाजता आयोजित केले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आद. व्ही. जे. गायकवाड, तर स्वागताध्यक्ष आद. आर. एल. सपकाळ असतील. सूत्रसंचालन आयु. संतोष सं. सपकाळ व आयु. योगेश सपकाळ करतील. 



या धम्ममेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून
आद. रविंद्र कांबळे उर्फ आबा (संस्थापक अध्यक्ष, नालंदा बुद्ध विहार ट्रस्ट),
अॅड. मंगेश धिवार,
आद. सुजाताताई रोकडे (महासचिव – नालंदा बुद्ध विहार ट्रस्ट, राष्ट्रीय उपाध्यक्षा – अखिल भारतीय बौद्ध महासंघ),
आणि आद. जी. बी. सपकाळ (राष्ट्रीय कोषाध्यक्ष – अखिल भारतीय बौद्ध महासंघ) उपस्थित राहणार आहेत. 



मुंबई व ग्रामीण विभागाच्या कार्यकारिणीतील पदाधिकारी तसेच संघटकांनी कार्यक्रमाच्या तयारीसाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.
धम्मप्रेमी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top