नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

घरफोडी करणाऱ्या सराईत दुकलीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड; चोरीचा माल केला हस्तगत

4k समाचार
पनवेल दि. १७ (संजय कदम) : पनवेल व आजूबाजूचे परिसरात विविध ठिकाणी घरफोडी चोरी करणा-या दुकलीला पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत केला आहे.  


पनवेल तालुका पोलीस ठाणे ह‌द्दीत भिंगारवाडी येथील बिअर शॉप मध्ये चोरीची घटना घडली होती. या गुन्ह्याची नोंद होताच पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, पनवेल प्रशांत मोहिते, सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) आनंदा कांबळे, गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सहा. पोलीस निरीक्षक अनुरुध्द गिजे, पोलीस उप निरीक्षक हर्षल राजपुत, पोहवा विजय देवरे, पोहवा महेश धुमाळ, पोहवा सुनिल कुदळे, पोहवा सतिष तांडेल, पोहवा शिवाजी बाबर, पोहवा भुषण म्हारसे, पोशि आकाश भगत, पोशि भिमराव खताळ आदींच्या पथकाने गोपनिय माहिती प्राप्त करुन तसेच तांत्रीक तपासाव्दारे आरोपी नामे सुदाम भगवान वाघे (वय २६) व विधीसंघर्षग्रस्त बालक यांचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न करुन त्यांना पनवेल परिसरातून अटक करण्यात आली आहे. 

आरोपीकडे करण्यात आलेल्या तपासादरम्यान त्याचेकडून दोन मोबाईल, एक मोबाईल चार्जर, गुन्हयामध्ये वापरलेली मोटरसायकल, गुन्हा करतांना सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत असलेले त्यांचे अंगावरील कपडे व २९ हजार रोख रक्कम असा एकूण ६५ हजार तीनशे रुपये किमतीचा माल हस्तगत केला आहे. संबंधित गुन्हेगारांवर पनवेल तालूका पोलीस ठाणे, खालापूर पोलीस ठाणे आणि रसायनी पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top