नवीन बातम्या
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ
उरण महाविद्यालयात जपानी भाषा  प्रशिक्षणाची सुरुवात.
महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा. महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी.
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.
उरणमध्ये राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाची पर्वणी;
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे २६ वे राज्यस्तरीय वर्षा मॅरेथॉन व फुटबॉल स्पर्धेचे भव्य आयोजन.
गुरु-शिष्य परंपरेचा जागर; विचुंबे येथे गुरुपौर्णिमा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
टेलिग्राम ट्रेडिंगच्या आमिषाने १९.९० लाखांची फसवणूक; मध्य प्रदेशातील आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात
रायगड भूषण जितेंद्र अनंतकुमार म्हात्रे यांचा ‘माऊली’ सन्मानाने विशेष गौरव
सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; मान्यवरांच्या उपस्थितीत झाला गौरव सोहळा

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.




4kNews कामोठे
उरण दि  8(विठ्ठल ममताबादे )कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी अग्रेसर असणारे राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटना कामगारांना त्यांचे न्यायी हक्क मिळवून देण्यात नेहमीच अग्रेसर असते. या वर्षातील ९ वा करार करण्यात संघटना यशस्वी झाली आहे.



मे. अमेया CFS (PSA) खोपटे येथील सर्व्हेअर कामगारांचा पगारवाढीचा करार बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे आपल्या नेतृत्व कौशल्याने अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ देण्यात यशस्वी झाले आहेत. तसा करार आज कामगार उपायुक्त रायगड यांच्या कार्यालयात सहाय्यक कामगार आयुक्त  मनीषा काटकर यांच्या उपस्थितीत पार पडला.



या करारनाम्यानुसार कामगारांना प्रथमवर्षी तब्बल ८०% पगारवाढ म्हणजे ५७६०/- रुपये तर द्वितीय व तृतीय १४४० रुपये देण्याचे मान्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर १४% बोनस ३ लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी देण्याचे मान्य करण्यात आले आहे. कामगारांना गणपती सणापूर्वी पगारवाढीच्या फरकाची रक्कम मिळणार आहे त्यामुळे कामगारांमधे आनंदाचे वातावरण आहे.



या प्रसंगी न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष पि. के. रमण, सरचिटणीस वैभव पाटील, सचिव अरुण म्हात्रे, व्यवस्थापनातर्फे एचआर मॅनेजर  नायर, कायदेशिर सल्लागार ऍड.सागर घरत, पर्ल पोर्टलाईन चे मॅनेजिंग डायरेक्टर जमशेद अश्रफ, मॅनेजर विशाल ठाकूर, कामगार प्रतिनिधी सुजित म्हात्रे, महेंद्र भगत, श्रेयस भगत, हितेंद्र म्हात्रे, अक्षय ठाकूर, कुलदीप भगत, प्रशांत ठाकूर, ऋतुराज गावंड, मनिष भगत, नवनित ठाकूर, राम ठाकूर, विलास थळे, विनय म्हात्रे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top