नवीन बातम्या
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.
करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!
*केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्यामंदिरात रेनकोट व छत्री वाटप*
*आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक*
माची प्रबळगडावर रस्ता चुकलेल्या दोन अल्पवयीन पर्यटकांची सुखरूप सुटका.
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ
उरण महाविद्यालयात जपानी भाषा  प्रशिक्षणाची सुरुवात.
महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा. महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी.
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.

पनवेलमध्ये सिलिंडरला लागलेली आग वेळीच विझवली; मोठा अनर्थ टळला

4k समाचार
पनवेल दि.२८(वार्ताहर): पनवेल शहरातील लक्ष्मी वसाहत झोपडपट्टी परिसरात सकाळी सिलिंडरला लागलेल्या आगीमुळे मोठी खळबळ उडाली. सुदैवाने, अग्निशमन दलाने योग्य वेळी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. 


  ही माहिती मिळताच माजी नगरसेविका दर्शन भोंईर यांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला तत्काळ कळविले. त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विजवली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.  गॅस सिलिंडरमधून झालेल्या गळतीमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग शेजारील घरांपर्यंत पसरली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनीही तातडीने मदतीला धाव घेतली. या वेळी राजू कोळी, हसन बागवान, रोशन जाधव, चंद्रकांत जगे आणि इतर नागरिक घटनास्थळी उपस्थित होते. पनवेल महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी परिसरात सुरक्षेचे उपाय वाढवले जाणार आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top