नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

रिसॉर्टमधील स्वच्छतागृहात छुप्या कॅमेराने रेकॉर्डींग करणाऱ्याला अटक

4k समाचार
पनवेल दि.२८(वार्ताहर): पनवेल तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फार्महाऊसमध्ये आलेल्या महिला पर्यटकांच्या बाथरूममध्ये गुप्तरीत्या स्पाय कॅमेरा बसवून अश्लील चित्रीकरण केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्वरीत कारवाई करत अरोपी मॅनेजरला अटक केली आहे. ही कारवाई तळोजा पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात आली आहे. 


तळोजा पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलजवळील एका फार्महाऊसमध्ये महिला पर्यटक विश्रांतीसाठी आलेल्या होत्या. याच दरम्यान त्यांना बाथरूममध्ये लपवलेला कॅमेरा आढळला. महिलांनी त्वरित याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला असता बाथरूममधील आरशामागे सूक्ष्म आकाराचा स्पाय कॅमेरा बसवलेला आढळून आला. तपासात हा कॅमेरा फार्महाऊसचा मॅनेजरनेच बसविल्याचे समोर आले. पोलिसांनी मॅनेजरला ताब्यात घेऊन त्याच्याकडील मोबाईल व लॅपटॉप जप्त केले आहेत. त्यामध्ये अनेक महिला पर्यटकांचे चित्रीकरण केलेले व्हिडिओ सापडले असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top