अज्ञात कारणावरुन सहकार्‍याची केली आरोपीने 20 किलो वजन डोक्यात टाकून हत्या


पनवेल, दि.15 (संजय कदम) ः अज्ञात करणावरुन आपल्या सहकार्‍याच्या डोक्यात 20 किलो वजन टाकून त्याची हत्या केल्याची घटना करंजाडे येथे घडली आहे.


ताराचंद गुप्ता यांच्याकडे काम करणारा आरोपी धरम गोपाल राय (27 रा.उत्तरप्रदेश) याने त्याच दुकानात काम करणारा दुसरा कामगार अनिल सुदामा बिंद उर्फ गुड्डू (29 रा.उत्तरप्रदेश) यांच्यात अज्ञात कारणावरुन आरोपी धरम राय याने अनिल बिंद याच्या डोक्यात 20 किलो वजन मारुन त्याची हत्या केली आहे.

या घटनेची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळताच वपोनि नितीन ठाकरे, पो.नि.शाकीर पटेल, सपोनि घेवडेकर, केदार, पोउपनि.शेलार, सोळंके आदींच्या पथकाने सदर ठिकाणी धाव घेवून तात्काळ आरोपीला ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीने कोणत्या प्रमुख कारणावरुन सहकार्‍याची हत्या केली याचा पुढील शोध सपोनि घेवडेकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top