4k समाचार दि. 25
मुंबई | महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात सध्या ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असला तरी आज (२५ ऑगस्ट) कोकण विभागात जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांबरोबरच उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने संबंधित भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे..

दरम्यान, विदर्भात हलक्या सरी आणि ढगाळ हवामान राहणार असून, नागरिकांना हवामानातील बदल लक्षात घेऊन आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
