4k समाचार
मुंबई दि. 13 (वार्ताहर): अखिल भारतीय बौद्ध भिक्खू संघाच्या वतीने “बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती महामोर्चा” हा भव्य मोर्चा दि.१४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता आझाद मैदान, बोरीबंदर (मुंबई) येथे आयोजित करण्यात आला आहे.

या मोर्चात रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतील विविध गट-तटांतील तसेच विविध राजकीय पक्षांतील बौद्ध नेते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. बोधगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी आणि बौद्ध जनतेच्या हक्कासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असून आयोजकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
मोर्चात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या धम्मबांधवासाठी सोयीसाठी १ लाख पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात येणार आहे असल्याची माहिती धम्मबांधव अनिल पवार यांनी दिली आहे.
