पनवेल दि.२१ (संजय कदम): कुडाळदेशकर आद्यगौडब्राम्हण पनवेल व ओरायन मॉल पनवेल यांच्या संयुक्तविद्यमाने सामाजिक ऊपक्रमा अंतर्गत, नेहरु सायंन्स सेंटर, मुंबई यांच्या सहयोगाने ‘ऐओरायन मॉल पनवेल येथे विद्यार्थी साठी “ऐक अद्भुत प्रयोगशाळा”हे सायंन्स प्रदर्शन आयोजित केली आहे.

हे प्रदर्शन व त्यातील मुलांसाठी चे वर्कशॉप याचे शुल्क रुपए ३०० येवढे आहे. परंतु तळागाळातील शाळेतील विद्यार्थीना ही प्रदर्शन बधता यावी या साठी कुडाळदेशकर आद्य गौड़ ब्राह्मण संस्था पनवेल व ओरायन मॉल यांच्या सामाजिक ऊपक्रमा अंतर्गत, बालग्राम अनाथ आश्रम पनवेल आणि जिल्हा परीषद शाळा , कराळे वाडी , जिल्हा कर्जत येथील विद्यार्थी साठी हे प्रदर्शनी विनामुल्य दाखवायचे ठरवले होते. या सायंन्स प्रदर्शना चा मनमुराद आनंद मुला मुलीनी घेतला.

नेहरू सायन्स सेंटर येथुन आलेल्या स्वयंसेवकांनी प्रदर्शनातील प्रतेक प्रयोग व त्या मागचे सायंन्स मुलांना समजऊन सांगीतले. वस्तुच्या चढ उतारा चे प्रयोग, बिंदु डोळ्या समोरुन नाहीसा होणे, दृष्टि भ्रम अशा अनेक प्रयोगाचे प्रत्यक्षीक दाखऊन नंतर सर्व मुलांना सगळे प्रयोग स्वतः अनुभवण्यास सांगीतले. नंतर सर्व मुलांचे सायंन्स वर्कशॉप घेतले . प्रत्तेकाला काही वस्तू देऊन प्रयोग करायला सांगीतले व पुस्तकातले सायंन्स कसे प्रयोगातून अनुभवायला मिळते याची माहिती दिली. या नंतर सर्व विद्यार्थीना ऑरायन मॉलच्या फुड कोर्ट मधे अल्पोपहारा साठी बर्गर दिल्यावर मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. अनेक मुला मुलींनी आजचा दिवस आमच्या साठी खास होता सायंन्स प्रदर्शनाने खुप माहिती मिळाली असे सांगीतले. ऑरायन मॉल चे मालक व कुडाळदेशकर आद्य गौड़ ब्राह्मण चे अध्यक्ष मंगेश परुळेकर यांनी सांगीतले की , समाजाच्या तळागाळा तील मुलांची या सायंन्स प्रदर्शना मुळे शिकण्याची गोडी वाढावी , त्यांना प्रेरणा मिळावी हा ऊद्देश या मागे आहे

. मुलांच्या चेहर्या वरचा आनंद पाहुन बरे वाटले व शिक्षकांनी ही आम्हाला धंन्यवाद दिले .असेच ऊपक्रम आम्ही पुढेही राबवणार आहोत असे ते म्हणाले. या सामाजिक ऊपक्रमा साठी कुडाळदेशकर आद्य गौड़ ब्राह्मण पनवेल संस्थे तर्फे श्री शाम वालावलकर, अक्षय वालावलकर निशा वालावलकर , भाऊ सामंत , यतीन ठाकुर उपस्थित होते.
