4k समाचार पनवेल, दि. 12 (प्रतिनिधी) : पनवेल तालुक्यातील जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाला. रिक्षा आणि भरधाव कारची जोरदार धडक होऊन रिक्षाचालक रवी लोहार जखमी झाले.

ही घटना सहा ऑगस्ट रोजी रात्री सुमारे दीडच्या सुमारास घडली. पनवेल रेल्वे स्थानकावरून प्रवासी सोडून कोनगावकडे परतणाऱ्या रिक्षाला एका भरधाव कारने धडक दिली. या अपघातात रिक्षा आणि कारचे मोठे नुकसान झाले. धडक दिल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला.

जखमी रिक्षाचालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी फरार कारचालकाचा शोध सुरू केला आहे.
