4k समाचार
मुंबई : दहिसर येथे दहीहंडीच्या सरावावेळी सहाव्या थरावरून पडल्याने ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला. रविवारी रात्री केतकी पाडा परिसरातील नवतरुण मित्र मंडळासोबत महेश रमेश जाधव हा सराव करत असताना ही घटना घडली.

सरावादरम्यान तोल जाऊन महेश खाली कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र गंभीर दुखापतीमुळे उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी दहिसर पोलिसांनी पथकाध्यक्ष बाळू सुरनार यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. महेशचा मृत्यू केवळ पाय घसरून झाला की यात काही संशयास्पद बाब आहे, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
