4k समाचार दि. 12
पनवेल : पनवेल शहर पोलिसांच्या विशेष पथकाने अवैध दारू साठ्यावर मोठी कारवाई करत हजारो रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त केला आहे. पळस्पे, पुष्पक नगर आणि उसर्ली परिसरात सोमवारी ही धाडसत्रे राबवण्यात आली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे या ठिकाणी अचानक छापे टाकले असता मोठ्या प्रमाणावर देशी दारूचा साठा सापडला. या साठ्याची किंमत हजारो रुपयांमध्ये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत.
