नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

पनवेलच्या बाजारपेठा नाताळ निमित्त सजल्या

4kNews
पनवेल दि.10 (वार्ताहर):  नाताळ हा सर्ण सर्व जाती-धर्मातील नागरिकांकडून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. विशेषकरून बच्चे कंपनीमध्ये या सणाचे विशेष आकर्षण असते. अवघ्या काही दिवसांवर नाताळ येऊन ठेपला असल्याने पनवेल परिसरातील विविध ठिकाणच्या बाजारपेठा सजावटीच्या साहित्यांनी सजल्या आहेत. ख्रिसमसनिमित्त होणाऱ्या सेलीब्रेशनची आतापासूनच जय्यत तयारी सुरु झाल्याचे दिसत आहे. 


नाताळ जवळ आल्याने शहरांतील बाजारपेठा, दुकाने व मॉल्स ख्रिसमस ट्री, रंगीबेरंगी लाईट्स, बेल्स, स्टार्स, सांताच्या टोप्या, केक, सजावटीच्या वस्तू आदी साहित्यांनी सजल्या आहेत. यानिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे. सध्यास्थितीत बाजारपेठेत सजावटीच्या वस्तूंमध्ये विविध आकारांचे ख्रिसमस ट्री, जिंगल बेल्स, विद्युत माळा (लाईट्स), स्टार्स, टिनसेल, बॉल्स आणि स्टॉकिंग्ज, ख्रिस्त जन्माचे साहित्य, मुखवटे आणि सांताक्लॉजच्या टोप्या दाखल झाल्या आहेत. तसेच खाद्यपदार्थांमध्ये विविध फ्लेवर्सचे केक, विशेषतः प्लम केकचीमागणी जास्त असते. त्यामुळे हे केक उपलब्ध करून देण्यावर दुकानदारांकडून भर दिला जात आहे. विशेषकरून लहान मुलांसाठी बाजारात सांताक्लॉजसारखे ड्रेस, कानटोपी, ग्लोज, शूज, पोतडी बॅग्जही आल्या आहेत. बच्चे कंपनीत सांताक्लॉजचे खास आकर्षण असल्याने चॉकलेट गिफ्ट घेवून येणाऱ्या सांताक्लॉजचे आकर्षक मुखवटे, टोपी यांची खरेदी आतापासून होतांना दिसत आहे. काही ठिकाणी साहित्याच्या किमतीत वाढ झाली आहे, तरीही उत्साहामुळे खरेदी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top