भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत पनवेल विधानसभा मतदारसंघाने आमदार प्रशांत ठाकूर व भाजपचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

या सदस्य नोंदणी अंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर सक्रिय सदस्य झाले आहेत. त्या संदर्भातील सक्रिय सदस्य फॉर्म पनवेल शहर भाजपचे अध्यक्ष अनिल भगत यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख व जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल आदी उपस्थित होते.
