4k समाचार दि. 12
पनवेल (वार्ताहर) – पनवेलजवळील उसर्ली येथील नदीत पोहण्यासाठी गेलेल्या कळंबोलीतील दोन तरुणांचा सोमवारी दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये सुमित कदम (वय ३२) आणि अक्षय देसाई (वय २८) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमित कदम व अक्षय देसाई हे चौघा मित्रांसोबत उसर्ली नदीत पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघे खोल पाण्यात गेले आणि बुडाले. त्यांच्या मित्रांनी आरडाओरड करत मदत मागितली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेमुळे कळंबोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
