पनवेल :
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाचे सहव्यवस्थापक श्री. शंतनू गोयल यांनी 4K न्यूज चॅनलला दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाचे काम उद्घाटनानंतरही पुढील अनेक वर्षे सुरू राहणार आहे.

त्यांनी सांगितले की, दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले तरी विमानतळाच्या संपूर्ण प्रकल्पाला पूर्णत्व यायला अजून वेळ लागणार आहे. कारण या विमानतळावर २ धावपट्ट्या (Runways), ४ टर्मिनल्स (Terminals) व इतर महत्त्वाची कामे उभी करणे बाकी आहे.

या सर्व कामांची पूर्तता होण्यासाठी अजून सुमारे १२ वर्षांचा कालावधी लागेल आणि त्यामुळे विमानतळाचे काम सन २०३८ पर्यंत सुरू राहील, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.
ही माहिती त्यांनी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

