पनवेल (दि.17)- सिद्धांत सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पनवेल मधील स्व.दि.बा.पाटील शाळेमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,

या स्पर्धेमध्ये वेगवेगळे गट मिळून एकूण 100 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पहिली ते सातवी शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच खुला गट अशा प्रकारचे वर्गीकरण करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावरील आधारित एक प्रसंग असा विषय चित्रकला स्पर्धेसाठी ठेवण्यात आला होता. सर्वांनी आपल्या परीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित चित्र काढले होते. खुल्या गटामध्ये स्पर्धकाने काढलेली चित्रे खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट अधोरेखित करणारी होतीच परंतू डोळ्यासमोर प्रत्यक्ष चित्र उभी करणारी वाटत होती.

सर्व विजयी स्पर्धेकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रोख रक्कम तथा स्मार्ट वॉच देऊन गौरवण्यात आले, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन सेना जिल्हाधक्ष मा. संतोष पवार, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर पवार, महेश साळुंखे जिल्हाध्यक्ष,ओवळे ग्रामपंचायत सदस्य मा. राज सदावर्ते, संजय जाधव साहेब, गजानन जाधव साहेब,विसपुते कॉलेज चे आर्ट टीचर मा. नितीन जाधव सर, संस्थेचे अध्यक्ष मा. सागर जाधव, सचिव मा.प्रकाश जाधव, मार्गदर्शक मा.शैलेश गायकवाड, महिला प्रमुख मा.रत्नमाला पाबरेकर, खजिनदार मयूर जाधव, रुपेश जाधव, नवनाथ पाटील, सारंग जाधव ,अविनाश अडांगळे , सतेज गुरव, लक्ष्मण भगत, उपेंद्र भोईर आदी मान्यवर तथा संस्थेचे पदाधिकाऱी उपस्थित होते.
