नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यावर्षी पासून समाजसेवेसाठी पुरस्कार देणार


“लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक -शैक्षणिक सेवा गौरव” पुरस्कार


4k समाचार 30
पनवेल (प्रतिनिधी) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने पत्रकारितेत देदीप्यमान कामगिरी करणारया पत्रकारांना विविध पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित केले जाते.. यावर्षी पासून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारया व्यक्तींना “लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक-शैक्षणिक सेवा गौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ५१ हजार १११ रूपये रोख, मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.


  लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी परिषदेला दिलेल्या २५ लाख रुपयांच्या माध्यमातून व त्या ठेवीतून हा पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख आणि अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे केली आहे .फेब्रुवारी २०२६ मध्ये यंदाचे पुरस्कार दिले जातील. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेकडे विविध मान्यवरांनी ठेवलेल्या ठेवीच्या व्याजातून दरवर्षी १० पत्रकारांचा गौरव केला जातो. यामध्ये परिषद स्वतःच्या निधीतून एका ज्येष्ठ पत्रकाराचा “आचार्य बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार” देऊन गौरव करीत असते. त्याचे २५ हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असते.


   यावर्षी पासून सामाजिक आणि शेक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या एका मान्यवर व्यक्तीचा “लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक सेवा गौरव पुरस्कार” देऊन सन्मान केला जाणार आहे. एक निवड समिती पुरस्कार्थींची निवड करते आणि त्या अनुषंगाने पत्रकारितेच्या क्षेत्रात परिषदेचे पुरस्कार मानाचे समजले जातात. यापुढे एका समाजसेवकाचा सन्मान परिषदेच्या या पुरस्कारांची उंची वाढवणार आहे. या संदर्भात एस.एम.देशमुख, मिलिंद अष्टीवकर आणि पनवेल तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांनी नुकतीच पनवेल येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.यंदापासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या एका व्यक्तीचा गौरव “लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक-शैक्षणिक सेवा गौरव पुरस्काराने” केला जाणार असल्याने पत्रकारितेबरोबरच समाजकार्यासाठीही या व्यासपीठावर सन्मानाची नवी दिशा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top