नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

वाहन चोरी व मोबाईल चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगारांना पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड


पनवेल, दि.5 (संजय कदम) ः पनवेल परिसरात तसेच इतर ठिकाणी वाहन चोरीसह मोबाईल चोरी करणार्‍या सराईत दोन गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश आले असून यांच्या अटकेमुळे मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

तसेच त्यांच्याकडून आतापर्यंत जवळपास 4 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पनवेल तालुका पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात यज्ञ अपार्टमेंट, ओम ट्रेडर्स दुकानासमोर, डेरवली गाव येथे उभी करून ठेवलेली महिद्रां कंपनीचे पिकअप क्रं एम.एच 46 ई 3950 ही कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इरादयाने चोरी करून नेली म्हणुन पिकअप मालकानी दिलेल्या तक्ररीवरून पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर दाखल गुन्हयाचा तपास तसेच चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे दृष्टीने सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग, अशोक राजपुत यांचे मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गजानन घाडगे यांचे नेतृत्वाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक गठीत करण्यात आले. त्यानुसार पोनि गुन्हे आनंद कांबळे, सपोनि अनुरूद्ध गिजे, पोउपनि हर्षल राजपुत, पोहवा विजय देवरे, सुनिल कुदळे, महेश धुमाळ, शिवाजी बाबर, सतिश तांडेल, पोशि राजकुमार सोनकांबळे, आकाश भगत, भिमराव खताळ आदींच्या पथकाने कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना सदर गुन्हयाचा तांत्रिक व गोपनिय माहितीद्वारे गुन्हयाचा सखोल व कौशल्यपुर्ण तपास करून सदर गुन्हयातील 2 आरोपींना निष्पन्न केले त्यामध्ये आरोपी कौशल पाटील व रणजित रामप्रकाश सोनी यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून गुन्ह्यातील चार वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.

अधिक चौकशीमध्ये अजूनही वाहने व इतर मुद्देमाल पोलीस हस्तगत करतील असा विश्‍वास तपास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान हे आरोपी गुन्हे करून अटक झाल्यावर शिक्षा भोगून पुन्हा याच मार्गाचा अवलंब करतात व आतापर्यंत जवळपास 16 गुन्हे केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सदर आरोपींना दि. 7/02/2025 रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top