नवीन बातम्या
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन

क्रेड–इंडसइंड बँक रुपे क्रेडिट कार्ड लाँच : ई-कॉमर्स खर्चावर ५% रिवॉर्ड्स, फ्लाइट्स-हॉटेल्सवर सोपी रिडेंप्शन सुविधा 


4k समाचार दि. 20
पनवेल (प्रतिनिधी) सर्व प्रकारच्या ई-कॉमर्सवर रिवॉर्ड्स आणि फ्लाइट्स, हॉटेल्स, शेकडो व्यापारी आणि हजारो उत्पादनांवर तत्काळ, लवचिक रिडेम्प्शन यांसह क्रेडने एक नवीन क्रेडिट कार्ड प्रोग्राम सुरू केला आहे. या प्रोग्राममधील पहिले सादरीकरण म्हणजे क्रेड इंडसइंड बँक रुपे क्रेडिट कार्ड आहे. क्रेड सदस्य हे अनेक क्रेडिट कार्ड्स असलेले आणि ज्यांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात ऑनलाइन शॉपिंगवर अवलंबून आहे असे सुसंस्कृत डिजिटल नेटिव्ह आहेत. किंमत तडजोड: काही विशिष्ट व्यापाऱ्यांपुरते मर्यादित रिवॉर्ड्स, ऑप्टिमायझेशनच्या प्रयत्नात रिडेम्प्शनच्या मार्गांनी मर्यादित खरेदी,  यावर उपायसुविधा म्हणून प्रथम क्रेडने अनुरूप, सुसंगत समग्र सेवा सुरू केली. यामध्ये ऑनलाइन शॉपिंग वर जास्त रिवॉर्ड्स आणि क्रेड इकोसिस्टम मध्ये सोपे विनाअडथळा रिडेंप्शन मिळते.



          बहुतांश क्रेडिट कार्डधारक कुठे शॉपिंग करायचे आणि पॉइंट्स कसे वापरायचे यावर प्रभाव टाकणाऱ्या गुंतागुंतीच्या नियमांनुसार वागतात. पण क्रेड इंडसइंड बँक रुपे क्रेडिट कार्डधारक आपल्या पसंतीच्या ठिकाणी खर्च, कमाई आणि रिडेंप्शन करू शकतात. कार्डधारकांना सर्व ई-कॉमर्सवर केलेल्या खर्चावर 5% इतके पॉइंट्स आणि ऑफलाइन व्यवहारावर पॉइंट्स मिळतात. त्यामध्ये क्रेड स्कॅन अँड पे याचाही समावेश आहे. हे पॉइंट्स ते क्रेड इकोसिस्टम मध्ये रिडीम करू शकतात. त्यामध्ये खास कार्डधारकांसाठी बनवलेली नवीन फ्लाइट्स आणि हॉटेल्स उत्पादनेही आहेत.



  क्रेडचे संस्थापक कुणाल शाह म्हणाले, “क्रेडिट साठी योग्य असलेल्या लोकांना निवडीचे स्वातंत्र्य मिळायला हवे. नवीन क्रेड क्रेडिट कार्ड प्रोग्राम प्रत्येक ऑनलाइन खर्चाला स्व प्रकटीकरणाचे रूप देतो. त्यामध्ये रिवॉर्ड्स हे अटींवर नाही तर पर्याय, निवडीवर आधारित आहेत. इंडसइंड बँकेच्या कंझ्युमर बँकिंग अँड मार्केटिंगचे कंट्री हेड सौमित्र सेन म्हणाले, “इंडसइंड–क्रेड भागीदारी ही अगदी स्वाभाविक, नैसर्गिक आहे. 

याचे कारण दोन्ही ब्रँड्समध्ये नाविन्यपूर्णता, अनोखेपणाचे वैशिष्ट्य आणि प्रीमियम अनुभवांचा डीएनए आहे. एनपीसीआय ग्रोथच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सोहिनी राजोला म्हणाल्या, “रुपे भारताच्या डिजिटल-फर्स्ट ग्राहकांच्या आकांक्षा प्रतिबिंबित करणारे पेमेंट अनुभव तयार करण्यास बांधील आहे. क्रेड इंडसइंड क्रेडिट कार्डचे सादरीकरण हे या प्रवासातील आणखी एक पाऊल आहे ज्यामध्ये लवचिकता, तात्काळ रिवॉर्ड्स आणि सोपे रिडेंप्शन दररोजच्या वापरामध्ये येते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top