नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

वशेणी गावात दारूबंदी व हळदीला साडी घेण्याच्या प्रथेविरोधात जनजागृती रॅली.




4k समाचार
उरण दि 20 (विठ्ठल ममताबादे )
उरण तालुक्यातील वशेणी गावात वाढत्या सामाजिक समस्या आणि अनावश्यक प्रथा थांबविण्यासाठी  वशेणी गावात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. दारूबंदी तसेच हळदीला साडी घेण्याची प्रथा बंद करण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीत ग्रामस्थ, महिला मंडळ, युवक मंडळ तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “दारूबंदी करा – समाज वाचवा”, “अनाठायी प्रथा बंद करा – समाजाला नवा दिशा द्या” अशा घोषणा देत रॅलीतून जनतेला संदेश देण्यात आला.



गावातील प्रमुख नागरिक व कार्यकर्त्यांनी भाषणातून दारूचे दुष्परिणाम व अनावश्यक प्रथा थांबवल्यास होणारे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. गाव एकसंघ होऊन ही जनजागृती राबवल्यास समाजात सकारात्मक बदल घडेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.दारूबंदी साठी गावातील पोलीस पाटील व तालुका पोलीस अधिकारी सहकार्य करत असून येत्या काही दिवसात कडक कारवाई करण्यात येईल असे त्यांनी आश्वासीत केले आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, रॅलीमुळे गावात सामाजिक जागरूकतेची नवी ऊर्जा निर्माण झाल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.यावेळी ग्रामपंचायत सरपंच अनामिका म्हात्रे व सर्व ग्रामपंचायत सहकारी सदस्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top