नवीन बातम्या
आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड
एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये फायर अवेअरनेस प्रोग्राम आगीच्या दुर्घटनेपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाचे प्रशिक्षण
उरणच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा २५६ कुटुंबांची यादी अंतिम करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश; ४० वर्षांच्या संघर्षाला निर्णायक दिशा
शैक्षणिक नवोपक्रमांची राज्यस्तरावर दखल
शर्मिला महेंद्र गावंड यांना ‘शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार’
गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी माणुसकीचा पुढाकार!
वैभव कडू यांचा स्वखर्चातून समुद्रकिनारी विसर्जन मार्ग मोकळा
How to Accept Deposits and Partial Payments in WordPress (No WooCommerce)
Open Channels FM: Introducing Open Source Champions
शेकाप व एकता असोसिएशनतर्फे आयुष्मान भारत, आभा कार्ड नोंदणी शिबिर २५० नागरिकांनी घेतला लाभ
महिला संघटन मजबूत करण्यावर निधी शिंदे यांचे मार्गदर्शन

गेल्या दोन महिन्यांपासून महिलेची हत्या करून पसार असलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

4kNews कामोठे
पनवेल, दि. 12(संजय कदम) ः तब्बल दोन महिन्यांपूर्वी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून आरोपीला अटक करण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश आले आहे. करण नामदेव पाटील (राहणार फडके पाडा, शिळफाटा ठाणे) असे आरोपीचे नाव आहे.


11 एप्रिल रोजी पनवेल तालुका पोलिसांना चिंचवली जवळील पनवेल दुन्द्रे  रस्त्याच्या वनविभागाच्या जागेत झुडपामध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू केले. या महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन शोध घेतला. मात्र तिची ओळख पटली नाही. पोलिसांनी तब्बल 200 पेक्षा अधिक मिसिंग महिलांची पडताळणी केली. त्यासोबत पोलिसांचा तांत्रिक तपास सुरू केला. यावेळी हत्या झालेल्या महिलेच्या वर्णनासोबत एका महिलेची माहिती प्राप्त झाली आणि पोलिसांनी त्यानुसार आपला तपास सुरू केला. यावेळी शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनिता देवी भगवान राजभर (वय 30) या महिलेची ओळख पटली. तालुका पोलिसांनी या महिलेच्या संपर्कात असलेल्या इसमाला ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल फोन बाबत तपास केला असता तो मयत महिलेचे संपर्कात असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याच्याकडे तपास केला असता या अनिता देवी राजभर या महिलेने त्याच्यासोबत लग्नाचा तगादा लावला होता आणि त्याला तिच्यासोबत लग्न करायचे नसल्याने करण पाटील याने 6 एप्रिल रोजी तिच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह कारमधून चिंचवली गावचे हद्दीत आणून कार मधील पेट्रोल काढले आणि ते तिच्या प्रेतावर टाकून तिला जाळून टाकले. 


गेल्या दोन महिन्यांपासून सदर तपास करत असताना पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, सहा.पो.आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि गजानन घाडगे, पो.नि.आनंद कांबळे, यांच्या सुचनेनुसार पो.उपनिरीक्षक दिपक शेळके, हर्षल राजपूत, अभिजीत व्हरांबळे, पो.अंमलदार सुनील कुदळे, आकाश भगत, शिवाजी बाबर, सतीश तांडेल, विजय देवरे, विकास साळवी, जयदीप पवार, भानुदास मोटे, भुषण म्हारसे, भिमराव खताळ आदींच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे व गुप्त बातमीद्वाराद्वारे सदर आरोपीला गजाआड करण्यात यश मिळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top