नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

कामोठे मध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा २४ तासाचे आत उघड; २ आरोपींना पोलिसांनी केली अटक


पनवेल दि.०२(kNews): कामोठे वसाहतीमध्ये एका राहत्या घरामध्ये वृद्ध आईसह तिच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासात तपास करून आरोपींना अटक केली आहे. 
 कामोठे येथील ड्रीम्स सोसायटी फ्लॅट नं. १०४ से. ६, ता. पनवेल येथे गॅस लीक होवुन गॅसचा वास येत आहे अशी माहिती प्राप्त झाली होती. सदर ठिकाणी कामोठे पोलीस ठाणेचे बीट मार्शल पोहचले असता फ्लॅटचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले.

त्यामुळे त्यांनी फायर ब्रिगेडचे स्टाफच्या सहाय्याने दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता इसम जितेंद्र भुषण जग्गी (वय ४५ वर्षे) व त्याची आई गिता भुषण जग्गी (वय ७० वर्षे) हे मृत अवस्थेत वेगवेगळे बेडरुमध्ये मिळून आले होते. त्याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. प्रथमदर्शनी केलेल्या तपासात मयत इसमांना कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी जिवे ठार मारल्याचे दिसून येत होते. सदर प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता.गुन्हयाचे घटनास्थळी पोलीस परिमंडळ २ चे उप आयुक्त, प्रशांत मोहिते, सपोआ अशोक राजपूत, अजयकुमार लांडगे, यांनी भेट दिली. गुन्हयाचे गांभीर्य ओळखून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सपोआ, पनवेल विभाग यांचे पर्यवेक्षणाखाली ४ व सपोआ, गुन्हे शाखा यांचे पर्यवेक्षणाखाली गुन्हे शाखा, कक्ष २, गुन्हे शाखा, कक्ष ३ कडील विविध तपास पथके तयार करणेत आली होती. तपासादरम्यान पोउपनि किरण राऊत, व पोउपनि अमोल चौगुले, यांनी तांत्रिक तपास व साक्षीदारांकडे विचारपुस करून संज्योत मंगेश दोडके (वय १९ वर्षे) या संशयीत आरोपी बद्दलची माहिती पथकांना दिली होती.

या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना पोहवा तुकाराम सुर्यवंशी, यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन संज्योत मंगेश दोडके (वय – १९ वर्षे) आणि शुभम महिंद्र नारायणी (वय १९ वर्षे) यांना उलवे परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता मयत जितेंद्र जग्गी हा त्यांचे चांगले परिचयाचा असून मयताने त्यांना ३१ डिसेंबर २०२४ रोजी रात्री त्याचे फ्लॅटमध्ये पार्टी करण्यासाठी बोलावले होते. तिथे तिघेही दारु प्याले. त्यानंतर मयत जितेंद्र जग्गी हा त्यांना समलैंगिक संबंध ठेवणेकरीता आग्रह करत असल्याने शुभम नारायणी याने एक्सटेंशन बोर्ड जितेंद्रच्या डोक्यात मारुन त्याला जीवे ठार मारले तर संज्योत दोडके याने मयतच्या चे आईचा गळा आवळून ठार मारलेचे आणि जाताना मोबाईल फोन, पाकीट, टॅब व काही दागीने नेले. दोन्ही आरोर्पीना अटक करणेत आली असून गुन्हयाचा तपास कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे, या करीत आहेत..

सदरची कामगिरी सपोआ, पनवेल विभाग अशोक राजपूत, व सपोआ गुन्हे शाखा अजयकुमार लांडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी, गुन्हे शाखा कक्ष २. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी, गुन्हे शाखा, कक्ष – ३: वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे, कामोठे पोलीस ठाणे, सपोनि अजित कानगुडे, पोउपनि मानसिंग पाटील, पोउपनि अभयसिंह शिंदे, पोउपनि माधव इंगळे, गुन्हे शाखा कक्ष – २ सपोनि संतोष चव्हाण, सपोनि एकनाथ देसाई, सपोनि सुरज गोरे, पोउपनि लिंगराम देवकाते, पोउपनि आकाश पाटील, गुन्हे शाखा कक्ष ३ पोउपनि किरण राऊत, कामोठे पोलीस ठाणे, पोउपनि अमोल चौगुले, कळंबोली पोलीस ठाणे, गुन्हे शाखा कक्ष २ चे पोहवा रमेश शिंदे, अनिल पाटील, प्रशांत काटकर, मधुकर गडगे, तुकाराम सुर्यवंशी, निलेश पाटील, दिपक डोंगरे, इंद्रजीत कानु, रुपेश पाटील, सागर रसाळ, अजित पाटील, पोलीस नाईक अजिनाथ फुंदे, पोलीस शिपाई विक्रांत माळी, लवकुश शिंगाडे यांनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top