पनवेल, दि.28 (4kNews) ः पनवेल शहरातील परदेशी आळी येथे असणार्या शौकीन पान शॉप आणि जनरल स्टोअर्समध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे

सदर पान शॉपचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश आतील दुकानातील रोख रक्कमेसह इतर साहित्य मिळून असा जवळपास 40 हजाराच्या आसपास मुद्देमाल चोरुन नेला आहे. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.
