नवीन बातम्या
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न

पनवेल(4kNews) खांदा कॉलनी येथील सिकेटी कॉलेज अर्थात चांगु काना ठाकूर महाविद्यालयामध्ये सन २००४ च्या बॅचच्या कला शाखेमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.    

  
  कॉलेजचे माजी विद्यार्थी डॉ रमेश यादव व सहकारी यांनी एकत्र येऊन यावेळी जुन्या आठवणी जागृत केल्या. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला शिक्षणाचा आधार असतो आणि तोच आधार योग्यवेळी मिळाला तर विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होते. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांचे संबंध देखील घट्ट होते आणि हेच ऋणानुबंध जपण्यासाठी स्नेहसंमेलन आयोजित करुन विद्यार्थी अपल्या जुन्या मित्रांसह शिक्षकांसोबत विचारांची देवाण घेवाण करतात. त्यामुळे जीवनात या स्नेहसंमेलनाला अनन्य साधारण महत्व असते.

त्या पार्श्वभूमीवर हा आनंददायी सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी शिक्षक देखील उपस्थित होते .तसेच यावेळी सीकेटी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले.  आपल्या हाताखालून शिकून गेलेले विद्यार्थी आज चांगल्या उच्च पदावर असल्याचा अभिमान यावेळी शिक्षकांनी व्यक्त करत सर्वाना आशीर्वाद दिले. दरम्यान विद्यार्थ्यांनी देखील शिक्षकांबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमात जवळपास १०० हून अधिक माजी विद्यार्थी महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून आले होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top